समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – दरवर्षी प्रमाणे च यंदा ही दोन दिवसीय भगवान गोपालकृष्ण जन्मोत्सव सोहळा शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अनंतराव (किशोर) शेटे,उपाध्यक्ष डॉ.विकासराव शेटे यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. वर्षानुवर्षे चालत आलेली ही धार्मिक परंपरा समस्त शेटे कुटुंबीयांनी पिढ्यानपिढ्या सुरु ठेवली आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने आयोजित कार्यक्रामा त शुक्रवार दि. १५ रोजी रात्री १० ते १२ हभप भरत महाराज थोरात (चिंतन केसरी,राजगुरूनगर) यांचे सुश्राव्य व गोपालकृष्ण जन्मोत्सव वर आधारित कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली असून या कीर्तन सेवेसाठी हभप विठ्ठल महाराज पाबळे व विद्यार्थी वारकरी शिक्षण संस्था,शिंगवे ता.आंबेगाव यांची संगीतमय साथ मिळणार आहे. रात्री १२ वाजता गोपालकृष्ण जान्मोत्सव सोहाळा होणार असून शनिवार दि. १६ ला सकाळी ९ ते १२ पर्यंत काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी सहकार मंत्री,आमदार दिलीपराव वळसे पाटील,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे व मान्यवरांची उपस्थिती राहणार असून जन्मोत्सव सोहळा व काल्याची कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी अधीकाधीक भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री कसबा गणपती पुणे ट्रस्टचे अध्यक्ष व गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्टचे संचालक श्रीकांत भाऊ शेटे,ट्रस्टचे संचालक तथा युवा क्रांती फाँडेशन अंर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रसीद्धी प्रमुख मार्गदर्शक,राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,देवकीनंदन शेटे,शशिकांत शेटे,उदय शेटे,संतोष धारणे,परेश धारणे,चंद्रमोहन (खंडू) पाठक,विश्वास पुणेकर,विनायक पाठक,श्री गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट,सर्व संचालक कवठे व समस्त ग्रामस्थ कवठे येमाई यांनी केले आहे.
