समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युरिया खता बरोबर लिंकींग खते, औषधे व अतिरिक्त भाडे आकारू नये अशी स्पष्ट मागणी शिरूर तालुका ऍग्रो डीलर्स असोशियन ने पुणे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या लेखी पत्रात स्पष्ट मागणी केली असून या बाबतचे निवेदन त्यांना पाठविण्यात आल्याची माहिती असोशियन चे शिरूर तालुका अध्यक्ष नानासाहेब फुलसुंदर यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
या वर्षी शिरूर तालुक्याच्या बहुसंख्य भागात चांगला व समाधानकारक पाऊस झाल्याने व सध्या रब्बी हंगामातील गहु, ज्वारी, ऊस, मका हरभरा या सारख्या पिकाला युरीयाची (नत्र) खताची नितांत आवश्यकता असताना अनेक गावात युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.युरिया खताची आवश्यक्यता असुन काही खत कंपन्या अतिरीक्त भाडे आकारतात तसेच त्याबरोबर काही खते औषधे लिंकिंग करतात, याच कारणास्तव अनेकदा शेतकरी व विक्रेते यांच्यात वाद व तक्रारी होतात. त्या अनुषंगाने विक्रेते बिगर लिकिंग युरीया आला तर युरीया खरेदी करतात अथवा अथवा त्या सोबत अतरिक भाडे किंवा लिंकिंग आल्यास युरिया खत खरेदी करण्यास टाळाटाळ करतात.यात शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होते. तेव्हा आपण याकामी तात्काळ लक्ष घालून युरीया खताबरोबर अतिरिक्त भाडे किंवा लिंकींग येणार नाही या बाबत दक्षता घेण्याचे आवाहन ही शिरूर तालुका ऍग्रो डीलर्स असोशियन ने तालुक्यातील विक्रेत्यांच्या वतीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या मागणी निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील विक्रेत्यांच्या मागणीकडे विशेष लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची अपेक्षा असोशीयनचे अध्यक्ष फुलसुंदर यांनी निवेदनातून केली आहे.



