समाजशील न्यूज नेटवर्क – (शिरूर पुणे) – कर्ज काढून हप्त्याने घेतलेल्या दुचाकीचे हप्ते न भरल्याच्या कारणास्तव शिरूर च्या हद्दीत रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी सुनिल वडेवाले जवळ ता. शिरूर जि. पुणे येथे तिघांनी मिळवून एकाला शिवीगाळ दमदाटी करून, लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यातील जाधव नामक इसमाने फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली फोडुन दुखापत केली आहे तर एक अनोळखी इसमाने हातात दगड घेऊन फिर्यादीच्या उजव्या खांदयावर मारून त्यांना दुखापत केली आहे. या घटने बाबत किरण सावळा फुलारे वय २३ वर्षे व्यवसाय नोकरी रा. आंधळगाव ता. शिरूर जि. पुणे म्हणुन यांनी शिरूर पोलिसांत कायदेशीर फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगत करीत आहेत.
Home बातम्या पुणे दुचाकीच्या कर्जाचे हप्ते न भरल्याच्या कारणास्तव तिघांची एकाला मारहाण ; या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

दुचाकीच्या कर्जाचे हप्ते न भरल्याच्या कारणास्तव तिघांची एकाला मारहाण ; या प्रकरणी शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल
BySamajsheel NewsDecember 30, 20250
Previous Postयुरिया खता बरोबर लिंकींग खते, औषधे व अतिरिक्त भाडे नको - शिरूर तालुका ऍग्रो डीलर्स असोशियन ची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी
Next Postशिरूरच्या बहुसंख्य गावात युरिया ची टंचाई : युरिया तात्काळ उपलब्ध करा : शेतकऱ्यांची मागणी


