महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रांत अग्रेसर राहावे ही वळसे पाटील यांची प्रामाणिक इच्छा – राजेंद्र पोपटराव गावडे 

191

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रांत सदैव अग्रेसर राहावे ही राज्याचे सहकार मंत्री तथा शिरूर आंबेगाव चे भाग्यविधाते,कृतिशील आमदार दिलीपराव वळसे पाटील यांची प्रामाणिक इच्छा असल्याचे मत (रा.कॉ.अजितदादा गट) पुणे जिला उपाध्यक्ष राजेंद्र पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले आहे.  इथे प्रगतीचे नवनवे उच्चांक होत राहावेत, यासाठी नामदार दिलीप वळसे पाटील सतत कार्यरत असून त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे त्यांनी आपल्या दीर्घ सामाजिक – राजकीय कारकीर्दीत अनेक मोठं मोठी जनहिताची कामे केली.
       त्यांच्या प्रयत्नातून साकार झालेले विकासाचे चित्र पाहताना अनेक उदाहरणे देता येतील त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे एमएसइबी या कंपनीसह महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरणअशा कंपन्यांत विभाजन अस्तित्वात आले. दाभोळ वीज कंपनीकडून लवाद कायद्याप्रमाणे राज्य वीज मंडळाकडे सव्वीस हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. वीज मंडळाचे अधिकारी व तज्ज्ञ यांच्या बैठकांतील निष्कर्षांच्या आधारे केंद्र सरकारने दाभोळ पॉवर कंपनीशी चर्चा केल्यावर हा वाद मिटला आणि वीज मंडळावरील भुर्दंड ही टळला.
 ना.वळसे पाटील पाठपुराव्याने महिला व लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती विधेयक लागू करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला. बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक
कायद्याअंतर्गत (पॉक्सो) अनिर्णित राहिलेली प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी १०८ विशेष जलदगती न्यायालये आणि पॉक्सो अंतर्गत तीस न्यायालये यांची स्थापना करण्यात आली. महिलांचे व लहान मुलांचे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र व न्यायसहाय्य प्रयोगशाळा ;तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील ९४ पोलीस ठाण्यांत निर्भया पथके.महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पोलीसआयुक्त कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रातील महिला दक्षता समित्यांची फेररचना.कोविड- १९ मुळे दगावलेल्या ३९४ पोलीस अधिकाऱ्यांच्या वारसांना व कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये सानुग्रह सहाय्य,अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजमाफीसाठी अकरा लाखांचे विशेष पॅकेज डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून
सहकारी पतसंस्थांना तीन कोटी साठ लाख रुपये.सहकारी साखर कारखान्यांना सहवीजनिर्मिती प्रकल्पांसाठी शासकीय भागभांडवल देण्याचा महत्त्वाचा निर्णय.
जानेवारी २००५ मध्ये नगर जिल्ह्यातील कोठेवाडीवर दरोडा. लुटालूट करून नऊ महिलांवर अत्याचार. तेथे पालकत्वाची भूमिका ना.वळसे पाटील यांनी बजावली  विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री
निधीतून कोठेवाडीचे पुनर्वसन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मांढरदेवीच्या यात्रेत जानेवारी २००५ मध्ये दर्शनरांगेत चेंगराचेंगरी, साडेतीनशे भाविकांचा मृत्यू या प्रकारचा धोका टाळण्यासाठी
देवस्थान परिसराचा विकास, रस्ते, प्रशस्त दर्शनमार्ग व इतर कामे करण्यात आली.
आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर जुलै २०१४ रोजी डोंगराचा कडा कोसळून दीडशे जण दगावल्याच्या दुर्घटनेनंतर तातडीने मदतकार्य, मृतांच्या वारसांना माणशी पाच लाखांची मदत, नंतर आनडे येथे माळीण गावाचे पुनर्वसन करण्यात वळसे पाटील साहेबांचे मोठे योगदान आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विधिमंडळाचे संगणकीकरण, सदनाचे कामकाज ऑनलाईन; तसेच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्याचे थेट प्रसारण.धर्मादाय संस्थांच्या रुग्णालयांत दहा टक्के खाटा गरिबांसाठी राखीव ठेवण्याबाबत अध्यक्ष या नात्याने वळसे साहेबांनी निर्देश दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर शहरांचे सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने नदीकाठावरील गावांना दूषित पाणी मिळत असे. या संदर्भात या महापालिकांनी जिल्हाधिक यांकडे प्रत्येकी ५ कोटी रुपये जमा करण्याची
सूचना यातून राजगुरुनगर, शिरूर, दौंड या नदीकाठच्यागावांमध्ये आरओ (रिव्हर्स ऑस्मॉसिस) मशीन बसवण्यात आल्या. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत पारदर्शकता आणि सामाईक प्रवेशप्रक्रिया व्हावी म्हणून (सीईटी) अंमलातआणली. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसाठी शुल्कनिर्धारण समितीद्वारे शुल्कनिश्चितीचे धोरण आखल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची दारे खुली करण्यात वळसे पाटील यांनी खूप मोठे प्रयत्न केले.
नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची (एमकेसीएल) स्थापना केली. संस्थेच्या एमएससीआयटी अभ्यासक्रमानंतर पंचवीस हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेतर्फे (NAAC : नॅक) महाविद्यालयाचे मूल्यमापन.अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय यांना निवडणुकीद्वारे विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत प्रथमच स्थान निर्माण करून दिले. तंत्रशिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीतून प्रकल्पाची अंमलबजावणी.महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक साहित्याच्या खंडांचे प्रकाशन.तंत्रशिक्षणात दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी उद्योगपतींच्या अनुभवाचा उपयोग करण्यात आला. वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यांत मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज लक्षात घेऊन अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ५६ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला. राज्यातील खूप काही प्रकल्प,विविध विकास कामांना अगदी झोकून देत कार्य करणारे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील शिरूर,आंबेगाव मधील जनतेच्या हरएक प्रश्न सोडविण्याकामी सदैव प्रयत्नशील असतात. वळसे पाटील यांच्या सारख्या लोकहितवादी,जनसामान्यांच्या प्रश्नी हमदर्दी असणाऱ्या जाणकार नेत्याची शिरूर आंबेगाव सह राज्याच्या राजकारणात ही आजही नक्कीच मोठीच गरज आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds