शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जय मल्हार हायस्कुल विद्यालयाचे माजी उपशिक्षक तसेच शिष्यवृती परिक्षा तज्ञ इंग्रजी विषयाचे शिक्षक,महर्षी शिंदे हायस्कुल आंबळे ता. शिरूर, जि. पुणे प्रशालेचे विद्यमान ‘मुख्याध्यापक’ संजयकुमार विठोबा जोरी यांना संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे यांचे तर्फे दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार नुकताच अवसरी ता.आंबेगाव येथील कवयत्री शांता शेळके सभागृह अवसरी ‘ मंचर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श मुख्याध्यापक संजय जोरी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. जांबुत गावामध्ये ३१ वर्ष शिक्षक म्हणून संजयकुमार जोरी यांनी अध्यापनाचे उत्कृष्ट काम केले.मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या भवितव्यात शिक्षक आणि शिक्षिकांचा मोठा अन् बहुमोल वाटा असतो, शिक्षक मुलांना घडवताना त्याची ज्ञानलालसा पूरी करतात. शिक्षक मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर घरी, समाजात कसं रहायचं कसं वागायचं काय करायचं, काय करू नये ह्याचा जीवन पाठ देतात. मुलांमधील सुप्त कलागुणांना बाहेर काढतात. त्या गुणांना खतपाणी घालून वाढवतात. विकसित करतात. भावी जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देतात. त्या चिमुकल्या पंखात गरुड भरारी घेण्याचं सामर्थ्य, शक्ती, बळ व आत्मविश्वास जागवतात.असेच विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जोरी यांनी केले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी किरणताई वळसे पाटील, विजयराव कोलते,. भगवानराव साळुंके,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,अमित बेनके,भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील ,अनिल तात्या मेहेर, सुनिताताई गावडे, मनिषाताई गावडे ,भगवानराव बोऱ्हाडे, माजी शिरूर पंचायत समिती सदस्य वासुदेव आण्णा जोरी, डॉ शिवाजीराव जगताप, माजी सरपंच बाळुशेठ फिरोदिया, बाळकृष्ण कड ‘राहूल रा जगताप, ग्रामपंचायत सदस्य पोपटशेठ फिरोदिया, गोरक्ष ग गाजरे, सुभाष रा जगताप,कारभारी थोरात ,बाळासाहेब बदर ,बबन कि गाजरे, शरद नाना पळसकर ,शिवाजी बदर, नवनाथ स जोरी,दिलीप खुपटे, विकास डफळ,रोहिदास ईसवे,विठ्ठल ग जोरी, पोपट सापते,कचर गायकवाड,आनंद शिंदे, गुलाबराव वाळुंज, दशरथ जगताप ,भरत देशमुख , विकास कवडे , भानुदास पळसकर , दशरथ शिंदे ,योगेश जोरी,आनंद जोरी,विष्णू गाडेकर, शुभम वाकचौरे,कापसे सर,आंधळे सर,जाधव सर ,शितोळे सर , आढाव सर, माळवे सर ,आंबळे येथील ग्रामस्थ व हायस्कूल सहकारी अध्यापक,कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.संजयकुमार जोरी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील,युवा नेते राजेंद्र गावडे,जांबुत,आंबळे ग्रामस्थांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.