राजगुरुनगरला पिकावरील सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प योजनेचे रब्बी हंगामाचे प्रशिक्षण संपन्न – उपविभागातील अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती 

232
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – आज शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर ला उपविभागीय कृषी अधिकारी, राजगुरुनगर यांच्या वतीने पिकावरील सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प योजनेचे रब्बी हंगामाचे प्रशिक्षण संपन्न प्रशिक्षण सभागृह,जिल्हा मध्यवर्ती फळरोपवटिका राजगुरुनगर येथे संपन्न झाले.या प्रशिक्षणाला उपविभागातील खेड,आंबेगाव,जुन्नर व शिरूर तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी रब्बी व उन्हाळी हंगामाचे प्रमुख पीक असलेले कांदा पिक उत्पादन तंत्र याविषयी राजीव काळे,वरिष्ठ शास्त्रज्ञ कांदा व लसूण संशोधन केंद्र, राजगुरुनगर यांनी उपस्थितांना    मार्गदर्शन केले. क्रॉपसॅप योजनेतील समाविष्ट पिके हरभरा,मका,रब्बी ज्वारी,ऊस याविषयी किडींची ओळख,जीवनक्रम,पिकावरील आर्थिक नुकसान पातळी,याविषयी दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ के.वी.के.नारायणगाव यांनी उपस्थित सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहायक, यांना उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले.  यावेळी दृक श्राव्य माध्यमाद्वारे, कीड व रोगांची ओळख,पिकावरील लक्षणे, नियंत्रणासाठी आवश्यक कीटकनाशके,पक्षीथांबे,याविषयी माहिती उपस्थितांना देण्यात आली. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रब्बी हंगामात कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतावर पिकांचे निश्चित प्लॉट निवडून सर्वेक्षण करणार आहेत.याप्रसंगी सतीश शिरसाठ उपविभागीय कृषी अधिकारी, राजगुरुनगर यांनी प्रशिक्षणात घेतलेल्या माहितीचा उपयोग पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी  सर्व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी करावा व कीड व रोगांबाबत विदयापिठामार्फत प्राप्त सल्ले शेतकऱ्यांना द्यावेत असे आवाहन उपस्थित सर्वांना केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद बनकर,तंत्र अधिकारी, राजगुरुनगर यांनी व आभारप्रदर्शन प्रकाश पवार कृषी सहायक यांनी केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds