समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आगामी दोन दिवसात अॅग्रिस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने या भागाचे सहायक कृषीअधिकारी नंदू जाधव,कवठे ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांनी केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याकामी अॅग्रिस्टॅक नोंदणी करणे खूप खूप महत्त्वाचा विषय असून ही नोंदणी करणे प्रत्येक शेतकऱ्यास अनिवार्य असल्याने याकडे कोणीही दुर्लक्ष न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने शेतीविषयक निर्णय आणि सेवा सुलभ करण्यासाठी अॅग्रिस्टॅक (Agristack) ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक आणि प्रभावी सेवा पुरवता येतील.यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आज व उद्या या दोन दिवसात आपली अॅग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी ही नोंदणी न केल्यास भविष्यात पुढील प्रमाणे अडचणी उद्भवू शकतात. 7/12, 8अ, फेरफार काढायला अडचणी येतील,आणि अॅग्रिस्टॅक नोंदणी केल्याशिवाय सोसायटी/बँक कर्ज मिळणे शक्य होणार नाही.या गोष्टी मिळणार नाहीत. वारस नोंद लावता येणार नाही. शेतीचे वाटणी पत्र करता येणार नाही. जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही,अॅग्रिस्टॅक नोंदणी शिवाय भविष्यात PM-किसान हप्ता मिळणार नाही.शेतीविषयक कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.पीक विमा मिळणार नाही, हवामान सल्ला,पिकाविषयी माहिती,कीड रोगबाबत माहिती, बाजारभाव माहिती, मृदा आरोग्य माहिती यातील कोणती समस्या उद्भवून आपले काम थांबू नये असे जर वाटत असेल, तर कृपया प्रत्येक शेतकऱ्याने लवकरात लवकर प्रत्यक्ष जाऊन महा ई सेवा केंद्र, किंवा सीएससी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालय येथे आपली नोंदणी करून घ्यावी.
अॅग्रिस्टॅक नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक (OTP साठी),SC/ST/OBC शेतकरी बांधव असतील तर त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्र, 7/12 (सात/बारा) इत्यादी कागदपत्रे सादर करावीत,
नोंदणी करण्यास टाळाटाळ केली आणि त्यामुळे भविष्यात वर नमूद केलेल्या पैकी कोणतीही अडचण उद्भवल्यास ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी याला जबाबदार राहणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी.अॅग्रिस्टॅक नोंदणी करीता या विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी नंदू जाधव कवठे येमाई, मुंजाळवाडी, इचकेवाडी , निमगाव दुडे, रावडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या 8975832632 या क्रमांकावर तसेच ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांच्या 7507935969 या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज शनिवार व उद्या रविवारी सुट्टी असून ही शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक नोंदणी तलाठी कार्यालयात सुरु राहणार असल्याचे नंदू जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.