समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.पत्रकार सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार,पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेचे मागील तीन वर्षांपासून समाजहिताचे कार्य राज्यभर जोमाने सुरू असून अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार विरुद्ध लढा व जनहिताचे प्रामाणिकपणे कार्य करीत असलेल्या युवा क्रांती संघटनेची मशाल समाजसेवेची आवड असणाऱ्या सर्व सामान्य सहकाऱ्यांना सोबत घेत राज्यातील अधिकाधिक गावात पोहचविणार असल्याचा संकल्प युवा क्रांती पोलीस मित्र संघानेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हभप मधुकर महाराज महादू अहिरे उर्फ अवचितानंद महाराज यांनी व्यक्त केला आहे. या करीता संघटनेत सहभागी झालेल्या सदस्य,पदाधिकाऱ्यांनी आपण जे निस्वार्थपणे जनसेवेचे व्रत हाती घेतले आहे ते प्रामाणिकपणे करण्याची गरज असल्याचे अहिरे महाराज म्हणाले. उत्तर महाराष्ट्रातील मनमाड तालुक्यासह सुरगाणा,कळवण तालुक्यात अधिकाधिक संघटन करण्यावर अहिरे महाराज यांनी लक्ष केंद्रीत केले असून नासिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुका अध्यक्ष काशिनाथ पवार,उपाध्यक्ष हरी दास महाले,उप अध्यक्ष अनिल भगरे अध्यक्ष, युवा उपाध्यक्ष मधुकर पालवा व पदाधिकारी यांचे माध्यमातून व सहकार्याने गावागावात जाऊन युवा क्रांतीची मशाल बुलंद करण्याचे कार्य करीत आहेत. तर संघटनेचे राष्ट्रीय मिडीया प्रमुख,मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे आपल्या लेखणीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य राज्यभर पोहचवत असल्याने त्यांचे हे कार्य नक्कीच गौरवास्पद,भूषणावह,आदर्शवत असल्याचे अवचितानंद महाराज अहिरे यांनी सांगितले.

संपूर्ण भारतभर कार्यक्षेत्र असणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ प नाना महाराज कापडणीस राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी सर राष्ट्रीय उपाध्यक्ष ह भ प नाना महाराज कापडणीस,डॉ.राजेश्वर हेंद्रे,शिवाजीराव शेलार,संघटनेच्या युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,उपाध्यक्षा श्रीमती वर्षा नाईक,अमृत पठारे, सिंदखेडच्या शोभा पाटील, व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी उत्तम संघटन मार्गदर्शन मिळत असून संघटनेच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांवर होत असलेल्या अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचारा विरुद्ध लढा देत आवाज उठविण्यास महत्वपूर्ण मदत होत असल्याचे प्रदेशाध्यक्ष मधुकर अहिरे महाराज म्हणाले.