समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण ,माहिती अधीकार संघटने चा उत्तर महाराष्ट्र मेळावा धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथे रविवार दि. ७ ला आयोजित करण्यात आला असून राज्यातील अनेक राष्ट्रीय,राज्य,जिल्हा,तालुका स्तरीय पदाधिकारी,सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या राष्ट्रीय संघटक शोभा पाटील यांनी सा.समाजशिल शी माहीती
विदर्भातील खास करून उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्य मेळावा शिंदखेडा जिल्हा धुळे येथे भव्यस्वरूपात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून यानुसार धुळे जिल्ह्यातील युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय संघटक शोभा पाटील, संघटनेचे प्रदेश युवा सचिव धुळे जिल्हा अध्यक्ष गिरीश मोरे,महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव शबाना शेख हे जिल्यातील पदाधिकारी व सदस्यासह दोन महिन्यापासून या मेळाव्याची जोरदार तयारी करत आहेत.हा मेळावा उत्तम प्रकारे पार पडणार असून सर्व कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठांनी केलेल्या नियोजनाचा आदरपूर्वक सन्मान करावा. नियोजित वेळेमध्येच कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. वेळेवरच सदरचा कार्यक्रम सुरू होईल याप्रमाणे सर्वांनी कार्यक्रम स्थळी ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी पावणे दहाच्या आत पोहोचावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.










