समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र शासनाच्या १० कोटी वेर्क्ष लागवड महिने अंतर्गत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दि. ३० सप्टेंबरला शिरूर तालुक्यातील मलठण मंडल विभागा अंतर्गत मलठण,लाखेवाडी,कवठे येमाई गावातील सरकारी गायरान जमिनीत पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती मलठणचे मंडल अधिकारी विजय फलके यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
आज शनिवारी सकाळी दहा वाजता या वृक्ष लागवड मोहिमेस लाखेवाडी,मलठण येथून सुरुवात करण्यात आली. तेथे सुमारे ४५० वर वृक्ष लावण्यात आले. याकामी जेसीबी च्या साहाय्याने गायरान जमिनीत खड्डे घेण्यात आले.तर सुमारे १५ महिला मजुरांच्या साहाय्याने ही झाडे लावण्यात आली. कवठे येमाई येथील गायरान गट क्रमांक २६७ मध्ये देखील याच पद्धतीने ४५० च्या वर झाडे लावण्यात आली. मागील दोन दिवस या भागात बर्यापैकी पाऊस पडला असून आता आणखी पाऊस पडल्यास या झाडांना जगण्यासाठी वाढीसाठी मोठीच मदत होणार असून लावलेली झाडे यावर्षी जर जगली तर या परिसरात मोठी वनराई फुलणार आहे. शेतकऱ्यांनी ही आपापल्या जागेत,जमिनीत,बांधांवर विविध प्रकारची झाडे लावून वृक्ष संवर्धन व पर्यावरण रक्षणास हातभार लावण्याचे आवाहन युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे यांनी केली आहे, आज कवठे येमाई येथील गायरान जमिनीत वृक्ष लागवडी दरम्यान मंडळ अधिकारी फलके,शेतकरी लव्हाजी सांडभोर,सोसायटीचे सचिव शुभम सावंत,योगेश कांदळकर,ग्रामपंचायत प्रतिनिधी बबन नाना शिंदे,अमोल पंचरास,कैलास व भिवसेन कुळके,शेतकरी महिला उपस्थित होत्या.
