समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील रहिवासी माधव सयाजी जाधव (वय 62) यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना तातडीने लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी लवकरात लवकर लिव्हर प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला असून वेळेत उपचार न झाल्यास जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माधव जाधव हे कुटुंब प्रमुख असून घरातील सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मात्र सध्या त्यांच्या आजारपणामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. जाधव कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने महागड्या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च उचलणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय ठरत आहे.या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा सा.पोलिस तपासच्या महाराष्ट्र राज्य महिला सिनिअर क्राईम रिपोर्टर श्रीमती वर्षाताई नाईक यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांना मानवतेच्या दृष्टीकोनातून पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “जर एखाद्या दानशूर व्यक्तीने लिव्हर दान किंवा आर्थिक मदत केली, तर जाधव कुटुंबाला नवसंजीवनी मिळू शकते आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळेल.”
लिव्हर दानासाठी इच्छुक व्यक्तींनी तसेच आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जाधव यांचा मुलगा आदित्य जाधव यांच्या 7218637360 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती नाईक यांनी केले आहे. मानवतेच्या दृष्टीने पुढे येऊन एका कुटुंबाला नवजीवन देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी श्रीमती नाईक यांनी केले आहे.

धामणी (ता. आंबेगाव) येथील माधव जाधव यांना लिव्हर प्रत्यारोपणासाठी मदतीचे आवाहन
BySamajsheel NewsMarch 30, 20260
