युवा ग्रामीण पत्रकार संघात जरांडे,शर्मा,माने यांची निवड : विभागीय अध्यक्ष अडागळे यांनी विविध पदांवर केली नियुक्ती 

19
समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे टीमकडून विविध पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जरांडे,शर्मा,माने या नव्या पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.
उत्कृष्ट समाजकार्य व सक्रिय कार्यासाठी ओळख असलेले आदरणीय दत्तात्रय जरांडे यांची पुणे शहर संघटक पदी, पोलीस तपास रिपोर्टर म्हणून कार्यरत असलेले आणि समाजाभिमुख काम करणारे चेतन शर्मा यांची पुणे शहर सचिव पदी तर निवृत्त पोलीस उप निरीक्षक व सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय अग्रेसर असलेले विठ्ठल माने यांची पुणे शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व मान्यवरांचे पुणे टीमच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पोलीस तपास महाराष्ट्र राज्यचे सिनिअर क्राईम रिपोर्टर वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,महाराष्ट्र प्रदेश पोलीस तपासच्या सिनिअर महिला क्राईम रिपोर्टर श्रीमती वर्षाताई नाईक यांनी आज निवड झालेल्या मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
या नियुक्तीमुळे संघटनेला अधिक बळ मिळून पत्रकारिता व समाजकार्य क्षेत्रात नव नवे उपक्रम राबवले जातील,असा विश्वास संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विशाल बाळासाहेब अडागळे यांनी व्यक्त केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *