समाजशील न्यूज नेटवर्कशिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील येमाई गावातील सार्वजनिक रस्ते व शासकीय जागांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत कवठे येमाई ग्रामपंचायतीने नागरिकांना नोटीस दिली आहे.आज दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने ही सूचना (दवंडी) देण्यात आली असून, संबंधित नागरिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीच्या नोटिशीनुसार, गावातील विविध भागांमध्ये रस्त्यांवर तसेच सार्वजनिक वापराच्या जागांवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे.प्राप्त माहिती नुसार ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने संबधीत गटाची मोजणी 27 तारखेला होणार असून कोणी ही अतिक्रमण करू नये अन्यथा कडक कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे. यामध्ये गट क्रमांक ३२६ सरकारी गायरान जमिनीची मोजणी होणार असून लगत असणारे गट पूर्व,पश्चिम दक्षिण उत्तर चतुर्सिमा गट पुढील प्रमाणे ३२७,३२८, ३३०, ३२५ व २२ पै यांसहयांसह संबंधित ठिकाणांचा उल्लेख करण्यात आला आहे. रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई प्रस्तावित असल्याचे नोटिशीत नमूद आहे.संबंधित नागरिकांनी आपल्या हद्दीतील अतिक्रमण तातडीने हटवून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे. अन्यथा अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत नियमानुसार कडक व तात्काळ कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्याचे आवाहन
गावातील रस्ते वाहतुकीसाठी खुले राहावेत आणि सार्वजनिक जागांचा वापर सुरळीत व्हावा, यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासक विस्तार अधिकारी बी आर गावडे,ग्राविकास अधिकारी पूनम थोरात चितलकर व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६

