समाजशील न्यूज नेटवर्क तळोदा,नंदुरबार : (देंवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण,माहिती अधिकार व किसान विकास मंच,भारत चा राज्यस्तरीय मेळावा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला,या कार्यक्रमाचे तळोदा टीमने उत्कृष्ट आयोजन केले होते.तर संघटनेच्या माध्यमातून व ध्येय धोरणानुसार सामाजिक क्षेत्रात सर्वांनी मिळून अधिक प्रभावीपणे संघटन व कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी हे होते.
प्रारंभी सकाळी १० ला आलेल्या मान्यवरांचे संघटनेच्या तळोदा,नंदुरबार टीमच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी राज्यासह मध्यप्रदेश,गुजरात राज्यातून संघटनेचे सुमारे पाचशे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांनी आपली सामाजिक कार्ये मांडत संघटनेच्या माध्यमातून गौरवच होत असल्याचे सांगितले.यावेळी संघटनेत उत्कृष्ट संघटन व सामाजिक कार्य करणाऱ्या महिला,पुरुष पदाधिकाऱ्यांचा शाल,श्रीफळ,ट्रॉफी,सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गौरवशाली कार्याबाबद्दल पदोन्नती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राष्ट्रीय संघटक डॉ. राजेश्वर हेंद्रे यांनी प्रभावीपणे केले तर तळोदा टीमच्या वतीने हरीश पाटील यांनी मानले. आलेल्या सर्व पाहुण्यांना तळोदा टीम च्या वतीने सर्वोत्कृस्ट नियोजनासह भोजनाचा आस्वाद देण्यात आला.

