NEWS
Search

बिबट्याची मेंढ्यांच्या कळपावर झेप : बिबट्याला हुसकावलं पण मेंढपाळ गंभीर जखमी : टाकळी हाजीच्या खटाटे वस्तीवर थरार 

57

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या बेट भागातील टाकळी हाजी येथील खटाटे वस्ती येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला. हुकूम भिवा काळे वय ६५ वर्षे या मेंढपाळाच्या मेंढ्यांच्या तळावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत काळे यांनी बिबट्याला प्रतिकार करत आपला व मेंढ्यांचा जीव वाचवला मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.


काळे यांनी त्यांच्या मेंढ्यांसाठी येथील भाऊ घोडे यांच्या शेतात वाघूरजाळी लावली होती. सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास बिबट्या वाघुरीच्या दिशेने आला व आतील मेंढ्यांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्या क्षणी हुकूम काळे हे वाघुरीच्या बाहेरच बाजूला झोपले होते. बिबट्याने आत झेप घेण्याचा प्रयत्न केला असताना त्याचा पुढील पंजा थेट काळे यांच्या डोक्यावर पडला. त्यावेळी ते जागे झाले, पण तोपर्यंत त्यांच्या डोक्यावर बिबट्याच्या नख्यांमुळे खोल जखमा झाल्या होत्या.
या गंभीर परिस्थितीतही काळे यांनी आरडाओरड करत बिबट्याला प्रतिकार केल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. मात्र काळे यांच्या डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमधून रक्तस्त्राव सुरू झाला होता. तरीही मी जर इथून गेलो तर माझ्या मेंढ्यांवर पुन्हा हल्ला होईल या विचाराने त्यांनी डोक्याला कपडा बांधून रात्र जागून काढली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds