समाजशील न्यूज नेटवर्क.शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कौटुंबिक वादातून महिलेवर व तिच्या पतीवर मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी त नमूद केल्यानुसार, घरगुती वादातून आरोपींनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यानंतर तिच्या घरातले व्यक्ती व पतीला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करत जखमी करण्यात आले.तसेच फिर्यादी महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान भांडणाचा आवाज आल्याने अमित महादू गावडे व सुदाम शिंगरूपे यांनी भांडण सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास टाकळी हाजी येथे घडली. आरोपी हे ट्रॅक्टर घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले व घरात घुसून वाद घालत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात शुभम बाळू गावडे, ओंकार बाळू गावडे, बाळू खंडू गावडे व संगीता बाळू गावडे (सर्व रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, पोलीस हवालदार उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसाचारात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

टाकळी हाजी येथे कौटुंबिक वादातून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
BySamajsheel NewsApril 26, 20260
Previous Postमुंबई विभागातील युवती अध्यक्ष शुणल नांगरे यांना युवा क्रांतीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार' जाहीर
Next Postशिरूरमध्ये एम.डी. ड्रग्ससह तिघांना अटक; २१.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
