शिरूरमध्ये एम.डी. ड्रग्ससह तिघांना अटक; २१.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

84

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १७ एप्रिल २६ रोजी पहाटे सुमारे दीड वाजता शिरूरच्या बाबुरावनगर ते न्हावरे (कानिफनाथ) फाटा रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी विशाल मारुती मोरे (वय 20, रा. बाफनामळा, शिरूर), प्रतीक संतोष लंघे (वय 25, रा. करडे, ता. शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय 26, रा. रामलिंग रोड, शिरूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून एकूण ४७.६० ग्रॅम मॅफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ९ लाख ५२ हजार रुपये आहे. याशिवाय दोन चारचाकी वाहने (वॅगनार व वेरना) आणि इतर साहित्य असा एकूण २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पाटील वॉशिंग सेंटरजवळ, शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर कच्च्या रस्त्याच्या कडेला करण्यात आली. आरोपी हे अंमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या बाळगत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार अशोककुमार पंदारे यांनी फिर्याद दिली असून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३३५/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २१ (ब) तसेच भारतीय न्यास संहिता कलम ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलीस हवालदार आगलावे यांनी दाखल अंमलदार म्हणून काम पाहिले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *