मुंबई विभागातील कांदिवली पूर्व तालुका महिला कार्याध्यक्षा इरशाद शेख यांना युवा क्रांतीचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार’ जाहीर 

15
समाजशील न्यूज नेटवर्क.मुंबई : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुंबई विभागातील युवा क्रांती संघटने अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या कांदिवली पूर्व तालुका महिला कार्याध्यक्षा इरशाद शेख यांना ‘उत्तम संघटन कौशल्य – २०२६’ अंतर्गत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिनांक २७ एप्रिल २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत पार पडलेल्या निवड प्रक्रियेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत मानाचे स्थान पटकावले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने केलेल्या प्रभावी कामाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. इरशाद शेख  यांनी संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशामुळे मुंबई,कांदिवली विभागासह संपूर्ण राज्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद उत्तम संघटन कौश्यल्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,संचालक नानासाहेब बढे,ह.भ.प राणे महाराज ( राष्ट्रीय सह कार्याध्यक्ष),मुंबईचे राकेश वाघ,धनेश रामरख्यानी मुंबई अध्यक्ष,कुणाल शाह मुंबई युवा अध्यक्ष,जसविंदर सिंग राणा मुंबई महिला उपाध्यक्षा,राज चौधरी ( महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष),सोहराब मुजावर मुंबई युवा सचिव,मुंबईतील,पदाधिकारी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सदस्य,प्रदेशाध्यक्ष भ.प. मधुकर आहिरे, प्रदेशाध्यक्ष ,किसान विकास मंच पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.राजेश्वर हेंद्रे,महाराष्ट्र प्रभारी शिवाजीराव शेलार,संचालक नानासाहेब बढे,भाऊसाहेब शेळके,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,राष्ट्रीय महिला सह संपर्क प्रमुख श्रीमती वर्षाताई नाईक,राष्ट्रीय जेष्ठ सल्लागार वसुधाताई नाईक, स्मिताताई बांदेकर,किरण ताई बेंडाळे व संघटनेतील सर्वच मान्यवर सदस्य,पदाधिकारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.
   



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *