बालाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत गाठले यशाचे शिखर

65
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) :  बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत आपल्या ज्ञानदीपाच्या प्रकाशाने सर्वत्र तेजोमय अशी यशाची आरास सजवली आहे. संस्थेचे अध्यक्ष सदाशिवआण्णा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवत विद्यालयाचा झेंडा गौरवाने उंचावला. अनेक विद्यार्थ्यांनी ‘शून्यातून सुरुवात करून आकाशाला गवसणी घातली.
बालाजी विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम जपली. विद्यालयातील धनश्री मुळे ९७.०० टक्के, वैष्णवी खरे ९३.२० टक्के, संस्कृती बोऱ्हाडे ९२.८० टक्के, प्राची चौगुले ९०.०० टक्के, यश विरकर ८५.६० टक्के, धनश्री कांबळे ८५.४० टक्के, श्रेयश घावटे ८२.२० टक्के, आर्यन बोरगे ८१.४० टक्के, प्रज्वल गाडीलकर ८०.०० टक्के, हर्षल नवल ८०.०० टक्के, आदिती शेळके ८०.६० टक्के या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले.
विद्यालयातील विषयानिहाय प्रथम आलेले विद्यार्थी – धनश्री मुळे (मराठी–९५ गुण), (इंग्रजी–९५ गुण), (गणित–९८ गुण), (समाजशास्त्र–९१ गुण) ही विद्यार्थिनी पाचही विषयात प्रथम आली आहे. वैष्णवी खरे (हिंदी–९५ गुण) मिळवत मानाचा तुरा रोवला.
संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे, उपमुख्याध्यापिका स्वाती चत्तर, शिक्षक पालक संघाचे सदस्य, विद्यालयाचे पालक, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *