समाजशील न्यूज नेटवर्क.माहूर,नांदेड : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसह उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळ्याचे श्री क्षेत्र माहूर जिल्हा नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना पत्रकारांना समाज कंठकांनकडून होणारा नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पत्रकारांना एक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता यावे, या उद्देशाने राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांच्या संकल्पनेतून ‘निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

या संघाचा दुसरा वर्धापन दिन येत्या ५ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन ५ जून रोजी माहूर येथे करण्यात आले आहे. उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, अध्यात्म, कायदेविषयक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच निर्भयपणे व निःपक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. पत्रकार हा लोकशाहीचा खरा चौथा आधारस्तंभ असुन तो तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडत असतो मात्र, त्याला संरक्षण व सन्मान मिळत नसल्याने या सोहळ्याच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सा.समाजशील शी बोलताना केले. या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी तसेच महाराष्ट्रातील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.सुभाष शेटे,महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्य श्रीमती वर्षाताई नाईक, पुणे विभागीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विशाल बाळासाहेब अडागळे,कार्याध्यक्ष कांता भाऊ राठोड,महिला पुणे जिल्हा अध्यक्षा सौ प्रतिभाताई महालकर यांनी केले आहे.

