युवा क्रांती संघटनेच्या राष्ट्रीय सह संपर्क प्रमुख यांना युवा क्रांतीचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार’ जाहीर : वर्षाताई नाईक यांनी वर्षभरात मिळवला दुसरा पुरस्कार 

11
समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुणे,धनकवडी येथील जेष्ठ समाजसेविका तथा युवा क्रांती संघटनेच्या राष्ट्रीय सह संपर्क प्रमुख श्रीमती वर्षाताई नाईक सन २०२५-२६वर्षात पोलीस मित्र संघटनेचा ‘उत्तम संघटन कौशल्य – २०२६’ अंतर्गत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दुसऱ्यांदा मिळविण्यात यशस्वी ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिनांक २७ एप्रिल २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत पार पडलेल्या निवड प्रक्रियेत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दुसऱ्यांदा या पुरस्काराचे मानाचे स्थान पटकावले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे,कर्नाटक,बेळगाव महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्रात संघटनेसाठी श्रीमती नाईक केलेल्या प्रभावी कामाची दखल घेऊन हा सन्मान वर्षाताई यांना आगामी २१ मे २० २६ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या संघटनेच्या ४ थ्या भव्यदिव्य व दिमाखदार वर्धापन दिन सोहळ्यात दोनीही महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. श्रीमती नाईक यांनी संघटन कौशल्य, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर अल्पावधीतच संघटनेत एक कुशल संघटक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या यशामुळे पुणे विभागासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गौरवास्पद वातावरण निर्माण झाले आहे.त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद उत्तम संघटन कौश्यल्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,संचालक तथा राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब बढे,ह.भ.प राणे महाराज ( राष्ट्रीय सह कार्याध्यक्ष),मुंबईचे राकेश वाघ,धनेश रामरख्यानी मुंबई अध्यक्ष,कुणाल शाह मुंबई युवा अध्यक्ष,जसविंदर सिंग राणा मुंबई महिला उपाध्यक्षा,राज चौधरी ( महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष),सोहराब मुजावर मुंबई युवा सचिव,मुंबईतील,पदाधिकारी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सदस्य,प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. मधुकर आहिरे, प्रदेशाध्यक्ष ,किसान विकास मंच पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.राजेश्वर हेंद्रे,महाराष्ट्र प्रभारी शिवाजीराव शेलार,संचालक भाऊसाहेब शेळके,हवेली तालुका कार्याध्यक्ष कुंदन नाईक,पुणे शहर उपाध्यक्ष समीर नाईक,राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,अमृत ताई पठारे राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष राष्ट्रीय जेष्ठ सल्लागार वसुधाताई नाईक, स्मिताताई बांदेकर,किरण ताई बेंडाळे,प्रतिभाताई महालकर,हर्षला मुलाणी,रूपाली खरात,वृषाली कोकमठाणकर,राजश्री वाघमारे,पुणे शहर टीम व संघटनेतील सर्वच मान्यवर सदस्य,पदाधिकारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *