शिरूर तालुक्याचा दहावी निकालात दमदार यश : ३२ शाळांचा १०० टक्के निकाल

230

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज शुक्रवार दि. ८ मे रोजी ऑनलाइन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात शिरूर तालुक्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत बाजी मारली आहे. तालुक्यातील एकूण ८५ माध्यमिक विद्यालयांपैकी तब्बल ३२ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

ऑनलाईन जाहीर झालेल्या निकालात शिरूर तालुक्याने सातत्यपूर्ण यश कायम ठेवत सरासरी ९५.७९ टक्के निकालाची नोंद केली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही यावर्षी मोठी वाढ दिसून आली आहे.

“यावर्षीचे शिरूर तालुक्याचे गुणवत्ता वैशिष्ट्य म्हणजे २२४६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याच्या गुणवत्तेचा आलेख उंचावला असून विशेष प्राविण्य श्रेणीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली आहे,” अशी माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. रामदास थिटे यांनी दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *