श्री. संभाजीराजे विद्यालयाची १०० टक्के निकाल परंपरा कायम

15

समर्थ गवळी ९५.२०% गुणांसह विद्यालयात प्रथम

शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ८ मे रोजी ऑनलाइन जाहीर झाला असून, श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालय, जातेगाव बुद्रुक विद्यालयाने ग्रामीण भागातील १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावी बोर्ड परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण ७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. निकालातील ठळक वैशिष्ट्ये म्हणजे ३३ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत, तर ४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. शिक्षकांचे नियोजनबद्ध वार्षिक अभ्यासक्रम नियोजन, डिजिटल माध्यमांचा अध्यापनात प्रभावी वापर, घटकनिहाय मार्गदर्शन तसेच सातत्यपूर्ण सराव परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले असल्याचे प्राचार्य थिटे यांनी सांगितले.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समर्थ संजय गवळी याने ९५.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. आदिती बापू मोरे हिने ९४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. सलोनी भागवत हिक्के हिने ९०.६० टक्के गुणांसह तृतीय, तर कु. स्नेहल बाबुराव इंगवले हिने ९०.२० टक्के गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल उमाप, सचिव प्रकाश पवार, उपाध्यक्ष सुगंधराव उमाप तसेच नियामक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *