समाजशील न्यूज नेटवर्क,मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड पोलिस ठाण्या लगत असलेल्या पोलिस वसाहतीच्या इमारती वरुन रात्रपाळी ला असणाऱ्या एका पोलिस हवालदाराने दि काल रविवार दि. ८ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरा च्या सुमारास छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने मुरबाड पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. या आत्महत्येचे कारण अजुन अस्पष्ट असुन तीन ते चार महिन्यापूर्वीच हा कर्मचारी मुरबाड पोलिस ठाण्यात कार्यरत झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरबाड पोलिस ठाण्यात रात्रपाळी साठी तैनात असलेले पोलिस हवालदार नामदेव मुरलीधर चारसकर वय ४५ वर्षे बक्कल क्र.२९११ याने पोलिस ठाण्या शेजारी असलेल्या पोलिस वसाहतीच्या इमारती वरुन रात्री पावणे अकरा च्या सुमारास कामावर तैनात असताना उडी मारून आत्महत्या केली. रात्रपाळी ला पोलिस ठाण्यात हजर असलेले ठाणे अंमलदार बाळासाहेब भोर व कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवून घडलेला प्रकार त्यांना सांगितला. मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच या कर्मचाऱ्याने प्राण सोडल्याचे समोर असल्याने त्यांचे शवविच्छेदन करून त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अजुन समोर न आल्याची माहिती मुरबाड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज कामात यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. मात्र या घटने मुळे आत्महत्या नेमक्या कुठल्या कारणास्तव केली याबाबत विवीध प्रकारची चर्चा सुरु आहे.