शिरूर,पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी व शिंदोडी येथील नदीपात्रात अनधिकृत गौण खनिज उत्खनन करण्याऱ्या वाळू तस्करांना शिरूर महसूलच्या पथकाचा दणका,२८ बोटी जाळल्या,वाळूमाफियांचे सुमारे १ कोटींचे नुकसान, आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

747
          शिरूर,पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपळाची वाडी व शिंदोडी येथील घोड नदीपात्रात अनधिकृत गौण खनिज उत्खनन करण्याऱ्या वाळू तस्करांना शिरूर महसूलच्या पथकाने आज शुक्रवारी मोठा दणका दिला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करताना शिरूर महसूल विभागाच्या पथकाने नदीपात्रातून अवैधरित्या वाळू काढण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या २८ बोटींवर कारवाई करून त्या जाळण्यात आल्या आहेत.
          शिरूर महसूल विभाग व पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत वाळूमाफियांचे सुमारे १ कोटींचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. या कारवाई मध्ये शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, पोलीस उपनिरीक्षक इनामदार, मंडळ अधिकारी गोसावी,  मंडळ अधिकारी निलेश घोडके व तलाठी  प्रशांत शेटे, नरवडे, प्रमोद लोखंडे, बेंडभर पोलीस नाईक जाधव व ओहोळ यांचा सहभाग होता.महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या पिंपळाची वाडी व शिंदोडी परिसरात केलेल्या धडक कारवाईने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर यापुढे ही अशा प्रकारची धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.
– प्रा. सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *