युवा क्रांती फाउंडेशनच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांचा आदर्श समाजसेविका पुरस्काराने गौरव 

156
समाजशील न्यूज नेटवर्क,नाशिक – (देवकीनंदन शेटे,संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष तथा युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच च्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीमती जयश्रीताई आहिरे यांचा नुकताच आदर्श समाजसेविका पुरस्काराने गौरव करण्यात आला.
     नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मूळ माहेर असलेल्या झोडगे या गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या जयश्री ताईंच्या युवा क्रांती संघटनेच्या माध्यममातून सुरु असलेल्या उत्कृष्ट सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्यातील दाखल घेत झोडगे येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      झोडगे येथे स्व.मा.चेअरमन भाऊसाहेब राजेंद्र देसले यांचे स्मरणार्थ नुकतीच आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या वेळी युवा क्रांती युवती अध्यक्ष,पोलीस मित्र श्रीमती जयश्री ताई अहिरे यांना शाल,श्रीफळ व भेटवस्तू मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या चेअरमन श्रीमती शितलताई देसले,सचिव श्री. बापूसाहेब निळकंठ देसले, व्हा.चेअरमन श्री दत्तात्रेय शिरुडे संचालक श्री.अण्णासाहेब छगन पिंगळे,श्री.पांडुरंग सोनजे,श्री उजवल खैरनार मुख्याध्यापक श्री.दीपक देशमुख उपमुख्याध्यापक श्री.सुधीर देसाई,पर्यवेक्षक श्रीमती सरोज देवरे,ज्येष्ठ शिक्षिका, श्रीमती ज्योती देसले,मीनल देसले,हिरो होंडा शोरूम चे संचालक श्री.देवेंद्र देसाई, सौ.वैशाली देसाई ,वक्तृत्व मंडळाचे अध्यक्ष श्री.सोनवणे,वरीष्ठ लिपिक श्री.विठ्ठल राव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
       जयश्रीताई अहिरे यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,हभप नाना महाराज कापडणीस,किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुभाष शेटे ,नानासाहेब बढे,शिवाजीराव शेलार,डॉ.राजेश्वर हेंद्रे,प्रियांका मुरकुटे ,जयश्री इंगळे,जयश्री गावित,अमृतताई पठारे,वसुधा नाईक,वर्षा नाईक,धुळ्याच्या शबाना शेख व राज्यातील पोलीस मित्र राष्ट्रीय किसान विकास मंच संघटनेतील राष्ट्रीय,राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी जयश्रीताईंचे अभिनंदन करीत पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds