NEWS
Search

 प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची ‘पोलीस तपास’च्या महाराष्ट्र राज्य सिनिअर क्राईम रिपोर्टर पदी नियुक्ती

665

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – सामाजिक बांधिलकी जपत गेल्या दोन दशकांपासून निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारिता करणारे वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची *साप्ताहिक पोलीस तपास’*च्या महाराष्ट्र राज्य सिनिअर क्राईम रिपोर्टर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली असून, मुख्य संपादक राजू जाधव (मुंबई) यांनी त्यांना नियुक्तीपत्र,ओळख पात्र नुकतेच प्रदान केले आहे.
प्रा. शेटे यांनी मागील 20 वर्षांपासून सामाजिक प्रश्न, गुन्हेगारी विषय आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी सातत्याने पत्रकारिता केली आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्नांना वाचा फुटली असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे पाठपुरावा केला आहे.नियुक्तीनंतर बोलताना प्रा. शेटे यांनी सांगितले की,”सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सत्य घटनांचे निर्भीड वार्तांकन करणे हेच माझे ध्येय राहील.”
   या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे वाशीम, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मणराव कुंभार पुणे , पीएसआय दिलीप पवार शिरूर, सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, तसेच कवठे येमाई गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मित्रपरिवार व स्नेहीजन यांनी प्रा. शेटे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. सुभाष अण्णा शेटे यांच्या या नियुक्तीमुळे साप्ताहिक पोलीस तपासच्या क्राईम रिपोर्टिंगला अधिक बळ मिळणार असून, महाराष्ट्रातील गुन्हेगारी घटनांचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण व वार्तांकन अधिक प्रभावीपणे होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *