समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे टीमकडून विविध पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जरांडे,शर्मा,माने या नव्या पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार रा.कार्यकारणी सदस्य विशाल अडागळे विठ्ठल माने दत्तात्रय जरांडे चेतन शर्मा
उत्कृष्ट समाजकार्य व सक्रिय कार्यासाठी ओळख असलेले आदरणीय दत्तात्रय जरांडे यांची पुणे शहर संघटक पदी, पोलीस तपास रिपोर्टर म्हणून कार्यरत असलेले आणि समाजाभिमुख काम करणारे चेतन शर्मा यांची पुणे शहर सचिव पदी तर निवृत्त पोलीस उप निरीक्षक व सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय अग्रेसर असलेले विठ्ठल माने यांची पुणे शहर उपाध्यक्ष पदी आगामी एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्व मान्यवरांचे पुणे टीमच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले असून त्यांच्या या निवडीबद्दल निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार सर,विभागीय अध्यक्ष पुणे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य विशाल अडागळे सर,पोलीस तपास महाराष्ट्र राज्यचे सिनिअर क्राईम रिपोर्टर वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे सर,महाराष्ट्र प्रदेश पोलीस तपासच्या सिनिअर महिला क्राईम रिपोर्टर श्रीमती वर्षाताई नाईक मॅडम यांनी व निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघातील सदस्य पदाधिकाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे. नियुक्तीमुळे संघटनेला अधिक बळ मिळून पत्रकारिता व समाजकार्य क्षेत्रात नव नवे उपक्रम राबवले जातील,असा विश्वास संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विशाल बाळासाहेब अडागळे यांनी व्यक्त केला आहे.

