शिरूर तालुक्यातील निमोणे येथे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान 

63
पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : निमोणे (ता. शिरूर) येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज शिरूर तालुक्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, पिकांचे नुकसान, तसेच घरांच्या व इतर मालमत्तेच्या झालेल्या हानीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी आमदार कटके यांनी नागरिकांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासन दरबारी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी प्रशासनातील विविध अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये शिरूर तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, कृषी अधिकारी सुवर्णा अदक, तसेच रविंद्रबापू काळे, पंचायत समिती सदस्य दिपक पवार व बबन वाळके यांचा समावेश होता. तसेच नुकसानग्रस्त भागातील सर्व मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनीही या दौऱ्यात सहभाग घेतला. या पाहणी दौऱ्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *