समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्याच्या कात्रज व स्वारगेट येथील PMPML डेपोमध्ये बस पास मिळवताना ज्येष्ठ नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तासन्तास रांगेत उभे राहूनही पास न मिळणे, विविध कारणे सांगून विलंब करणे किंवा नकार देणे, यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.प्रत्यक्ष पाहणीत धक्कादायक बाब समोर आली असून, डेपोमध्ये फक्त एकाच कर्मचाऱ्यावर संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आल्याने कामकाज संथ झाले आहे. याचा फटका विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान विद्यार्थ्यांना बसत असून, त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
या गैरव्यवस्थेविरोधात वरिष्ठ पत्रकार चेतन शर्मा यांनी थेट PMPML प्रशासनाला जाब विचारत कडक भूमिका घेतली आहे. “ही परिस्थिती अत्यंत गंभीर व निषेधार्ह असून तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
1) कात्रज व स्वारगेट डेपोमध्ये तातडीने २ ते ३ अतिरिक्त कर्मचारी नेमावेत
2) ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जलद सेवा काउंटर सुरू करावा
3)कागदपत्र तपासणी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करावी
4) बस पास तात्काळ देण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करावी
दरम्यान, या प्रकारामुळे PMPML प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.