वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर निवड

11

समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – पत्रकारिता क्षेत्रातील तब्बल वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर अधिकारी (मेंबर) म्हणून निवड करण्यात आली आहे.
संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश आर. कचकलवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. पत्रकारितेतील त्यांच्या समाजाभिमुख व निस्वार्थी कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष कचकलवार यांनी म्हटले आहे.


प्रा. शेटे यांच्या निवडीमुळे ग्रामीण पत्रकारांचे संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असून, विविध सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी तसेच पत्रकारितेतील मार्गदर्शनासाठी संघातील सदस्यांना प्रा.सुभाष अण्णा शेटे यांचा प्रदीर्घ अनुभव लाभणार आहे.
दरम्यान, विविध माध्यमांत कार्यरत असलेल्या प्रामाणिक व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या तरुण,तरुणी,युवती,युवकांनी,जेष्ठांनी संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी संघटनेचे सहसचिव कांता भाऊ राठोड (मो. 9860850423) तसेच प्रदेश कार्यकारणी सदस्य,वरिष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे (मो. 9975674286 / 9423083376) यांच्याशी संपर्क साधावा. ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करून समाजातील प्रत्येक घटकाच्या न्यायासाठी सदैव तत्पर राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.प्रा.शेटे अण्णा यांच्या या निवडीबद्दल संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश आर.कचकलवार,सहसचिव कांता भाऊ राठोड,विशाल अडागळे सर,पत्रकार संघात नव्याने सहभागी झाले पुणे शहरातील विठ्ठलराव माने,दत्तात्रय जरांडे,चेतन शर्मा,राजेंद्र पन्हाळे,प्रसिद्धी प्रमुख पुणे गहिनीनाथ राजे,अनिल रेळेकर,अमित तांबे,राजेंद्र  पन्हाळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्या श्रीमती वर्षाताई नाईक,वसुधाताई नाईक,प्रतिभाताई महालकर,राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील, नवी मुंबई जिल्हाधिकारी रामदास जगताप, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे,पराग साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवर्धन डहाके,शिरूर पंचायत समिती सदस्या कांचन राजेंद्र सांडभोर,माजी पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,राजू अप्पा गदादे,कवठे येमाईच्या सरपंच मनीषा पांडुरंग भोर,टाकळी हाजी च्या सरपंच अरुणाताई दामुअण्णा घोडे,पत्रकार मित्र,समस्त ग्रामस्थ,जि.प. शाळा व्यवस्थापन समिती,गावठाण कवठे येमाई यांनी अण्णांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *