शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी, मूलभूत हक्कांसाठी राष्ट्रीय किसान विकास मंच मध्ये सहभागी व्हा – प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष अण्णा शेटे यांचे आवाहन 

15
समाजशील शिरूर,पुणे  (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – जी सामाजिक संघटना किंवा जो राजकीय पक्ष शेतक-यांच्या हितासाठी काम करित आहोत असे दाखवून  जर शेतकऱ्यांच्या च मुळावर उठले असतील तर अशा सामाजिक संघटनांमधून किंवा राजकीय पक्षांमधून शेतक-यांनी राजीनामे देवून बाहेर पडावे व कुठल्याही सामाजिक संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता आपल्या न्याय मागण्या व मूलभूत हक्कांसाठी  विविध विभागात नाहक प्रलंबित राहत असलेले शेतीविषयी महत्वाचे प्रश्न व त्यामुळे अशा शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट व मानसिक ताण होत असल्याने शेती विषयक अनेक प्रश्नांची एकजुटीने व सहकार्यातून जलदगतीने सोडवणूक होण्याकामी भारत सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच मध्ये सहभागी व्हा असे विनम्र आवाहन राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी केले आहे. संघटनेत सहभागी होत संघटनेला साथ द्या प्रसंगी आपल्या न्याय हक्कासाठी स्वत:रस्त्यावर उतरावे लागले तरी तयारी ठेवावी लागेल असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी दिला आहे.
     सरकारच्या विरोधात नाही तर सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेसाठी किंवा शेतक-यांसाठी आखलेल्या चुकीच्या धोरणांविषयी सरकारशी लढा देण्याकरीता सर्व शेतक-यांनी एक व्हावे,एकत्र व्हावे,एका झेंड्याखाली यावे.तरच काही प्रमाणात का होईना शेतक-यांना न्याय मिळेल अन्यथा शेतकरी रोज न्यायाची प्रतीक्षा करीत राहील व रोज आत्महत्या करीत राहील असे ही पत्रकार शेटे म्हणाले.
         तर मंच चे संस्थापक महासचिव रविंद्र सूर्यवंशी,राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस, उपाध्यक्ष शिवाजीराव शेलारयांनी शेतक-यांनो जागे व्हा आता आपण आत्महत्या करायची नाही तर आपल्या न्याय मागण्या व हक्कासाठी साठी सरकारकडे पाठपुरावा,लढा देण्याचे कार्य आपल्याला करायचे असल्याचे सांगितले. तेव्हा राज्यातील विविध भागातील अधिकाधिक समाजसेवी,शेतकरी भावांनी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच मध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा.युवा क्रांती फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा पुढील महिन्यात शिर्डी येथे होणार असून त्या अगोदर सर्वांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहोत.गाव,तालुका,जिल्हा स्तरावर जे सहकारी दि. ०५ एप्रिल २०२६ ते ०९ मे २०२६ पर्यंत ११ सदस्य किसान विकास मंच मध्ये सहभागी करून घेतील त्यांना त्यांचे आय डी व पद फाउंडेशन तर्फे विनामूल्य दिले जाईल. जे सदस्य,पदाधिकारी शेतकरी मंच मध्ये २२ सदस्य जोडतील त्यांना २ पदाधिकारी आय डी संघटनेकडून विनामूल्य दिले जातील.यात ग्राम शाखा,तालुका शाखा,जिल्हा समिती स्थापन करावी. अधिक माहिती साठी संस्थापक रविंद्र सूर्यवंशी यांच्या ७४२७४७५६२९, प्रदेशाध्यक्ष सुभाष अण्णा शेटे यांच्या ९९७५६७४२८६ या क्रमांकावर संपर्क साधावा. ०९ मे पूर्वी संघटनेच्या किसान विकास विकास मंच मध्ये सहभागी होणाऱ्या सदस्य पदाधिकाऱ्यांना २१ मे रोजी शिर्डी येथे होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात ओरिजन आय डी प्रदान करण्यात येतील. या करीता अधिकाधिक संख्येने राष्ट्रीय किसान विकास मंच मध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस,प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष अण्णा शेटे  व मंच च्या पद!धिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *