समाजशील न्यूज नेटवर्क,कांदिवली पूर्व मुंबई : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने दामू नगर, कांदिवली (पूर्व) मुंबई येथे काल दि.४ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयुष्मान कार्ड नोंदणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युवा करणारी पोलीस मित्र संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संघटनेचे महाराष्ट्र सचिव राकेश वाघ आणि मुंबई महिला अध्यक्षा स्मिताताई बांदेकर यांनी केले. तसेच मुंबई युवा अध्यक्ष धनेश रामरख्यानी व मुंबई युवा सचिव कृणाल शाह यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरित्या करण्यात आले.
उत्तर मुंबई महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई म्हस्के यांच्या पुढाकारातून व कांदिवली तालुका मार्गदर्शक पदाधिकारी प्रकाश पवार यांच्या सहकार्याने अनेक नागरिकांची आयुष्मान कार्ड नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान सामाजिक व विधायक कार्यात प्रामाणिकपणे योगदान देत अग्रेसर असणाऱ्या युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कांदिवली पूर्व तालुका महिला युवा कार्याध्यक्ष परवीन शेख तसेच तालुका महिला कार्याध्यक्ष ईर्षाद शेख यांना आयडी कार्ड व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या विधायक व समाजउपयोगी उपक्रमाचे संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष,किसान विकास मंच चे राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी यांनी विशेष कौतुक करीत अभिनंदन केले असून संघटनेच्या शिलेदारांकडून अन्याय,अत्याचार,भ्रष्टाचार विरुद्ध लढा व सामाजिक मदतीचे उपक्रम यापुढे असेच अविरत सुरु राहतील असा विश्वास सा.समाजशील शी बोलताना दिला. कार्यक्रमाच्या शेवटी वंदना ताई म्हस्के यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व पदाधिकारी व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.