समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सातत्यपूर्ण कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अनिल दत्तात्रय रेळेकर आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. सांगली येथे जन्मलेले आणि चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेले रेळेकर यांना लहानपणापासूनच समाजकार्यात विशेष रुची होती.
२१ जून २०१९ रोजी ‘जागतिक योगा दिना’च्या निमित्ताने त्यांनी मांडलेली नाविन्यपूर्ण संकल्पना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर करून ती यशस्वीरित्या राबवली. या उपक्रमाची दखल घेत भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.कोविड-१९ च्या कठीण काळात, जेव्हा बहुतांश लोक घरात होते, तेव्हा रेळेकर यांनी रस्त्यावर उतरून गरजू नागरिकांना मदत केली. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तसेच ब्रह्माकुमारी संस्थेकडून त्यांना ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरविण्यात आले.

२६ मार्च २०२५ रोजी युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र अंतर्गत पुणे शहर पोलीस मित्र म्हणून त्यांना श्रीमती वर्षा नाईक यांच्या हस्ते कार्याची संधी मिळाली. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी,डॉ. राजेश्वर हेंद्रे, शिवाजीराव शेलार व प्रा.पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांसारख्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.अल्पावधीतच त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र अध्यक्ष ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली. “संघटनेने दाखवलेल्या विश्वासाला मी नक्की न्याय देईन आणि संघटनेच्या वाढीसाठी जोमाने काम करीन,” असा विश्वास त्यांनी सा. समाजशील शी बोलताना व्यक्त केला. तसेच नव्या सदस्यांना त्यांनी एकच संदेश दिला – “काम करा, संघटना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील.
रेळेकर यांचा विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग आहे. ते अमर एज्युकेशन सोसायटी व एस.पी. इंटरनॅशनल स्कूल येथे नियोजन व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असून, इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ (कात्रज) येथे जनसंपर्क अधिकारी, भारती विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक, अक्षर स्पर्श इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष, कुसुम उचलल्या फाउंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या ते सांभाळत आहेत. याशिवाय तिरुपती मैत्री कट्टा, तिरंगा मित्र मंडळ, मॉर्निंग टी ग्रुप तसेच इतर अनेक संघटनांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.अशा बहुआयामी कार्यातून मा. अनिल रेळेकर यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला असून, त्यांची वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

