NEWS
Search

युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेत पदोन्नती ; अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांचा निर्णय

33

समाजशील न्यूज नेटवर्क.शिर्डी : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – गेल्या चार वर्षांपासून अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने लढा देत असलेल्या युवा क्रांती पोलीस मित्र, ग्राहक पत्रकार संरक्षण, माहिती अधिकार संघटनेत यंदाच्या वर्षी नवीन पदनियुक्त्या आणि पदोन्नती जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी संघटनेतील कर्तृत्ववान नेतृत्वाला अधिक संधी देण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या पदोन्नतीमध्ये नानासाहेब बढे यांची राष्ट्रीय किसान विकास मंचच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच, डॉ. राजेश्वर हेंद्रे यांना पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्यकुशलतेमुळे संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.मुबंईत संघटनेचे खरे वाघ ठरलेले राकेश वाघ यांना ही पदोन्नती देण्यात आली असून त्यांची संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव तथा मुंबई प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


संघटनेत कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पदोन्नती जाहीर करण्यात आल्याचे अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले. या निर्णयामुळे संघटनेची ताकद अधिक वाढून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेले जाईल,असा विश्वास संघटनेतील सदस्य,पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.या नव्या नियुक्त्यांमुळे संघटनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित पदाधिकाऱ्यांवर विविध व सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *