समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत दंतरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि दंतरोगांची वेळीच तपासणी व उपचार व्हावेत, या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये माननीय डॉ. आकाश उचाळे व माननीय डॉ. संतोष उचाळे यांनी विद्यार्थ्यांना दातांची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी, दातांची नियमित स्वच्छता कशी राखावी, दातांच्या समस्या निर्माण होण्याची कारणे कोणती तसेच दंतरोग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची दंतरोग तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दातांची आरोग्यविषयक स्थिती जाणून घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. नियमित दात घासणे, योग्य आहार घेणे, अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन टाळणे आणि दातांमध्ये समस्या जाणवल्यास वेळ न दवडता दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे, याबाबत डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दातांच्या आरोग्याचे महत्त्व समजण्यास मदत झाली. शालेय वयातच आरोग्यदायी सवयी रुजविण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व मोठे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे प्राचार्य माननीय मुंजावडे एस. डी. यांनी डॉक्टर, आयोजक, शिक्षक व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय दाभाडे एस. एस. यांनी केले.

कार्यक्रमाचे व सूत्रसंचालन दाभाडे एस एस यांनी केले यावेळी विद्यालयातील महेंद्र दरवडे, शरद बोंबे,संतोष सोनवणे,मच्छिंद्रनाथ करंजकर,अनिल बाणखेले,हेमा कड्डे, शिल्पा नेहेरे, कामिनी गवळी, सत्यश्री थोरात, उज्वला पवार,सविता धसाडे,दर्शना राजगुरु,धनश्री तावरे,रंभा गांगुर्डे,योगेश गायकवाड,बाळासाहेब साकोरे,तृप्ती पाटील,प्रवीण कोतवाल,भाऊ शिंदे मामा असे सर्व सेवकवृंद, शिक्षक उपस्थित होते. दंतरोग निदान व मार्गदर्शनाच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांकडून कौतुक करण्यात आले.

