NEWS
Search

अहिल्यानगरमध्ये ‘दुसरे बालपण’ स्पर्धा २०२६; ज्येष्ठांसाठी कला-आनंदाचा अनोखा उत्सव

16

समाजशील न्यूज नेटवर्क,अहिल्यानगर : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक – ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. कांकरीयांचे मानकन्हैया ट्रस्ट यांच्या वतीने ‘दुसरे बालपण स्पर्धा २०२६’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील पहिलीच अशी ही स्पर्धा असून यंदा तिचे तिसरे वर्ष साजरे होत आहे.या स्पर्धेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ‘दुसऱ्या बालपणात’ आनंद, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास देणे हा आहे. ‘खास ज्येष्ठ नागरिकांसाठी कला-आनंद उत्सव’ या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

KK Dusre Balpan Spardha 2026 Form

विविध कला प्रकारांचा समावेश
स्पर्धेमध्ये नाटिका, संगीत नाटिका आणि नृत्यनाटिका असे विविध सादरीकरण प्रकार ठेवण्यात आले आहेत. यावर्षीचा विषय ‘विवाह सोहळा एक उत्सव’ असा ठेवण्यात आला असून, सहभागी स्पर्धकांनी या विषयावर आधारित सादरीकरण करायचे आहे.
स्पर्धेची तारीख व स्थळ
ही स्पर्धा बुधवार, दि. २० मे २०२६ रोजी माजली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर येथे होणार आहे. स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ मे २०२६ ठेवण्यात आली आहे.
आकर्षक पारितोषिके
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सांघिक प्रथम पारितोषिक : ₹५०००/-
सांघिक द्वितीय पारितोषिक : ₹३०००/-
सांघिक तृतीय पारितोषिक : ₹२०००/-
उत्तेजनार्थ पारितोषिक : ₹१०००/-
तसेच सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विशेषतः उत्कृष्ट लेखनासाठी स्वतंत्र पारितोषिकाचीही तरतूद करण्यात आली आहे.
संपर्क व नोंदणी
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी प्रिया दीदी यांच्याशी 9850887838 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करणारा हा ‘दुसरे बालपण’ उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *