समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील मलठण येथील सौ. पूजा महेश गोसावी यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मोठे यश संपादन करत पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे.अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या पूजा गोसावी यांनी अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय गाठले आहे.
शिक्षण आणि करिअरच्या वाटचालीत त्यांना सासरे विलास गोसावी (युवा क्रांती पोलीस मित्र संघटना, शिरूर) यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांनी रूढी-परंपरांना बाजूला ठेवत सुनबाई पूजाला शिरूर येथील शितोळे करिअर अकॅडमीत प्रवेश मिळवून दिला. तसेच मार्गदर्शक शिक्षक शितोळे सर यांनी शारीरिक व लेखी परीक्षेची योग्य तयारी करून घेतली.या मार्गदर्शनासह स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पूजाने सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार करत सुरुवातीला कारागृह पोलीस म्हणून काम केले आणि त्यानंतर आता पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे.

तिच्या या यशामुळे मलठण गावासह परिसरात आनंदाचे वातावरण असून, अनेक मुलींना प्रेरणा मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पूजा गोसावी आदर्श ठरत आहेत.
“गरीबी ही अडथळा नसून जिद्दीच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते,” हे पूजाने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे, अशी भावना तिचे सासरे विलास गोसावी,पती महेश गोसावी यांनी सा.समाजशातील शी बोलताना व्यक्त केली आहे.