समाजशील न्यूज नेटवर्क,तळोदा,नंदुरबार : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कालिकामाता यात्रेनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर यावर्षी ही तळोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी युवा क्रांती फाउंडेशन पोलिस मित्र तळोदा टीम ने मोठा पुढाकार घेतला.

यात्रेदरम्यान शिस्त राखणे,वाहतूक नियंत्रण करणे व भाविकांना मार्गदर्शन करणे यासाठी टीमचे सदस्य सक्रियपणे कार्यरत होते. या वेळी नंदुरबार जिल्हाध्यक्ष काशिनाथ भाऊ कोळी, महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्ष हरीशभाऊ पाटील, तळोदा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ चौधरी, पावभा ठाकरे तसेच इतर सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवत पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी व नागरिकांकडून तळोदा तालुका युवा क्रांती टीमच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

