डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मध्यान विश्वपीठतर्फे वसुधा वैभव नाईक आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

336
समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,वरिष्ठ कार्यकारी संपादक) = विश्वगुरू डॉ. मधुसूदन घाणेकर ब्रह्मा ध्यान विश्व पीठ तर्फे वसुधा इंटरनॅशनलच्या वसुधा वैभव नाईक यांना काल दि. १३ ला पुणे येथे झालेल्या विशेष सन्मान सोहळ्यात आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र व राष्ट्रीय किसान विकास मंचचे राष्ट्रीय पदाधिकारी डॉ. राजेश्वर हेंद्रे हे होते.
डॉक्टर मधुसूदन घाणेकर ब्रह्म ध्यान विश्वपीठ, वसुधा इंटरनॅशनल, युवा क्रांती संघटना या तीनही संघटनांनी मिळून यावेळी काव्य संमेलनाचे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.या काव्य संमेलनामध्ये एकूण वीस कवींचा सहभाग घेतला.
सर्व कवींनी उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.प्रत्येक कवीची कविता वेगळी होती. सुरेख शब्दाने कविता सजलेली होती.विश्वगुरू डॉ.घाणेकर यांनी आपल्या भाषणातून वसुधा नाईक यांच्या दैदीप्यमान कार्याच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकला.नाईक या वंचित बालांचे विश्व उजळवण्यासाठी मौलिक योगदान देत आहेत.फुटपाथ वरील शाळेतील बालांना आणि त्यांच्या पालकांना सातत्याने विविध मदतरूपी दिलासा देण्याचे कार्य करीत असून यथाशक्य आर्थिक मदतीचा हात देखील देण्याचे काम करीत आहेत.समाजातील वंचित महिलांना समूपदेशनातून त्यांच्यासाठी सबलीकरणाचेही कार्य करीत आहेत.महिला विश्वकल्याणासाठी वसुधा नाईक यांनी ध्यासच घेतल्यास पाहावयास मिळते.
 
          वसुधा नाईक यांनी आपल्या मनोगतातून  स्वतःचा विकास करत असताना समाजाचाही विकास त्या कसा करत आहेत हे आवर्जून सांगितले. आपले  बालपण कसे गेले हे देखील त्या सांगायला विसरल्या नाहीत.सध्याच्या डिजिटल युगात टिकायचे तर नवे तंत्रज्ञान शिकले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. त्यांची ‘ सुखाच्या सरी ‘ ही कविता वाचताना त्या खूप भावुक झाल्या होत्या.शाळेत शिक्षिकेची भूमिका बजावतानाच जीवनात यशस्वी कसे व्हायचे याचे आत्मज्ञान प्राप्त झाले “असे त्या म्हणाल्या.या पुरस्काराबद्दल सकारात्मक कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास युवा क्रांती फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवनशी यांच्या विशेष शुभेच्छा लाभल्या. युवाक्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा वर्षाताई नाईक,संघटनेचे पदाधिकारी,अमर पठारे,मोहिनी पठारे,भारत पंजाबी, उर्मिल मेहता, दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष गोरख अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्हध्यान विश्वपीठाच्या निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी केले.कोमल नाईक, शीतल शर्मा,योगेश हरणे, गौरव पुंडे आणि दीपराणी गोसावी यांनी कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds