किसान फार्मर आयडी बनविणे आवश्यक – कृषी सहायक नंदू जाधव यांचे आवाहन  

समाजशील न्यूज नेटवर्क. शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – निमगाव दुडे व रावडेवाडी, कवठे येमाई, मुंजाळवाडी, इचकेवाडी येथील सर्व शेतकरी बांधवांनी तात्काळ नजीकच्या अधिकृत सी एस सी केंद्रात जाऊन आपले किसान फार्मर आय डी रजिस्ट्रेशन बनवून घ्यावे असे आवाहान शासनाच्या कृषी विभाग शिरूर अंतर्गत या विभागाचे कृषी सहायक नंदू जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने शेतीविषयक निर्णय आणि सेवा सुलभ करण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक (Agristack) ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे शासनाला शेतकऱ्यांना कृषी विषयक अधिक अचूक आणि प्रभावी सेवा पुरवता येणार आहेत.यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन देखील जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.
सुवर्णा आदक – तालुका कृषी अधिकारी,शिरूर 
अग्रिस्टेक अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याचा फार्मर आय डी तयार करण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱयांना पी एम किसान डी बी टी लाभ,डिजिटल पीक कर्ज,पीक विमा,एम् एस पी लाभ,हवामान सूचना,पीक सल्ला,मृदा आरोग्य माहिती,बाजारभाव माहिती तसेच पिकावरील कीड व रोगांच्या प्रादुर्भावाचा अंदाज इत्यादी माहिती शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळणार असून फार्मर आयडी चा इतर ही शेती विषयक माहिती,व योजनासाठी लाभ होणार असल्याने सर्वच भू धारक शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी लवकरात लवकर बनवून घ्यावा.    

वरील पैकी कोणतीही  समस्या उद्भवून आपले काम थांबू नये असे जर वाटत असेल, तर कृपया प्रत्येक शेतकऱ्याने  प्रत्यक्ष महा ई सेवा केंद्र, सी एस सी केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय ऑपरेटर येथे आपली नोंदणी करून घ्यावी या नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड,आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक (OTP साठी),SC/ST/OBC शेतकरी बांधव असतील तर त्यांच्यासाठी जात प्रमाणपत्राचा क्रमांक आवश्यक आहे.कृपया याबद्दल कोणीही टाळाटाळ करू नये.नोंदणी करण्यास टाळाटाळ केली आणि त्यामुळे भविष्यात वर नमूद केलेल्या पैकी कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून शेतकरी बांधवानी तात्काळ फार्मर आय डी करून घेण्याचे आवाहन कृषि सहायक नंदू जाधव यांनी केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *