NEWS
Search

राजगुरुनगर च्या अध्यक्षा अनुराधा गोरक्ष घुले यांचा युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने गौरव : युवा क्रांती फाउंडेशनचे खेड तालुका अध्यक्ष श्री.अंकुश आगरकर यांच्या हस्ते घुले यांना ट्रॉफी प्रदान

101
समाजशील न्यूज नेटवर्क, राजगुरुनगर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  समाजातील दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आपुलकी दिव्यांग विकास केंद्र,राजगुरुनगर संस्थेच्या अध्यक्षा सौ.अनुराधा गोरक्ष घुले यांचा नुकताच पुणे येथे झालेल्या एका विशेष समारंभात युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ग्राहक व पत्रकार संरक्षण, पोलीस मित्र आणि माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

या सन्मान सोहळ्यात युवा क्रांती फाउंडेशनचे खेड तालुका अध्यक्ष अंकुश आगरकर यांच्या हस्ते घुले यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली.कार्यक्रमास केंद्राचे मार्गदर्शक आदरणीय साहेबराव पवळे तसेच केंद्रातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. अनुराधा घुले यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली मेहनत, त्यांच्याविषयी असणारी आपुलकी आणि समाजहिताची जाणीव या कार्यातून स्पष्ट दिसून येते. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने सौ.अनुराधा गोरक्ष घुले यांना आगामी काळातही अशाच जोमाने समाजकारण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *