नानासाहेब गयाबाई एकनाथराव बढे पाटील यांची राष्ट्रीय किसान विकास मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

16

समाजशील न्यूज नेटवर्क,छत्रपती संभाजीनगर (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी यांनी गोरगरीब जनता, मध्यम व अल्पभूधारक शेतकरी यांच्या हितासाठी संघटनेचे जेष्ठ संचालक नानासाहेब बढे पाटील यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत, सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी त्यांची राष्ट्रीय किसान विकास मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.


नानासाहेब बढे पाटील हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांत सक्रियपणे कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण मराठवाडा विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सामाजिक बांधिलकी, शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ आणि जनसामान्यांसाठी सातत्याने केलेले कार्य यामुळेच नानासाहेब बढे पाटील यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची भावना राष्ट्रीय किसान विकास मंच चे संकल्पक तथा प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,शिवाजीराव शेलार,डॉ.राजेश्वर हेंद्रे व अनेक मान्यवरांनी व्यक्त करीत  नानासाहेब बढे पाटील यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *