समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे (प्रतिनिधी,कांताभाऊ राठोड) – पुण्याच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिंचवड, निगडी, पिंपरी, चिखली तसेच परिसरातील अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे डीपी बॉक्स तुटलेल्या व उघड्या अवस्थेत आढळून येत आहेत. या उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांसह मुक्या प्राण्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.काही ठिकाणी करंट लागण्याच्या घटनाही घडत आहेत.गेली अनेक वर्षे हा प्रश्न कायम असून, भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी महावितरणने तातडीने सर्व डीपी बॉक्स व विद्युत तारा तपासून दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहर दलचे उमेश रमेश लोंढे यांनी या गंभीर प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात उघडे किंवा तुटलेले डीपी बॉक्स अथवा धोकादायक विद्युत तारा दिसल्यास तात्काळ स्थानिक वायरमन, महावितरण अधिकारी व लोकप्रतिनिधींना माहिती देऊन दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Home पुणे महावितरण कंपनीला कधी जाग येणार? उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांसह मुक्या प्राण्यांच्या जीवालाही धोका

महावितरण कंपनीला कधी जाग येणार? उघड्या डीपी बॉक्समुळे नागरिकांसह मुक्या प्राण्यांच्या जीवालाही धोका
BySamajsheel NewsAugust 30, 20260
Previous Postविद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारला ‘वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प ; न्यू इंग्लिश स्कूल कवठे मध्ये विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमाला मिळाली चालना
Next Postविशेष मुलांच्या सेवेला ‘सार्थक सेवा सन्मान’चा मानाचा मुजरा - आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याचा गौरव; आर्थिक मदतीचीही साथ
