समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – विशेष मुलांच्या शिक्षण, संगोपन, प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा ‘सार्थक सेवा सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.सार्थक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात प्रदान करण्यात आला. सार्थक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा स्वाती नामजोशी, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. पूनम किर्लोस्कर तसेच श्री. निरंजन किर्लोस्कर यांच्या शुभहस्ते आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी आकांक्षा फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याला बळ देण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदतही देण्यात आली. विशेष मुलांच्या आयुष्यात शिक्षण, प्रशिक्षण आणि आत्मनिर्भरतेची नवी वाट निर्माण करणाऱ्या संस्थेस मिळालेली ही मदत निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.
‘आकांक्षा’ म्हणजे विशेष मुलांच्या आयुष्यात आशेचा किरण
विशेष मुलांमधील क्षमता ओळखून त्यांना योग्य शिक्षण व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने वाटचाल घडवून आणणे, हे आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे.संस्थेच्या या सातत्यपूर्ण कार्याची समाजाने घेतलेली दखल आणि मिळालेला ‘सार्थक सेवा सन्मान’ हा केवळ पुरस्कार नसून, विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संपूर्ण आकांक्षा परिवाराच्या कार्याला मिळालेली कौतुकाची थाप आहे.या सन्मानामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीला नवी ऊर्जा, नवी उमेद आणि अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून, विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आकांक्षा फाउंडेशनची सेवा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.