अनिल विठ्ठल रायकर यांची महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या शिरूर तालुका सहसचिवपदी नियुक्ती

21

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक – महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या शिरूर तालुका सहसचिवपदी शिरूर तालुक्यातील कवठे येमाईचे युवा  सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल विठ्ठल रायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे जिल्हा शिरूर तालुक्यातील कार्यकारिणीत त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कल्याणराव ढोले, कार्याध्यक्ष मा. श्री. दामोदर बिडवे, सरचिटणीस श्री. पांडुरंग भवर तसेच जिल्हाध्यक्ष श्री. अशोक मगर,पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष रमेश राऊत, भाऊसाहेब पंडित, गणपतराव क्षीरसागर, शिरूर तालुका अध्यक्ष, रामदास जाधव,दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजातील बांधवांना संघटित करून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणे,तसेच महामंडळाच्या नियम व नियमावलीनुसार संघटनेचे कार्य प्रभावीपणे पुढे नेण्याची जबाबदारी रायकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.या नियुक्तीबद्दल अनिल विठ्ठल रायकर यांचे समस्त ग्रामस्थ कवठे येमाई व विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *