NEWS
Search

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारला ‘वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प ; न्यू इंग्लिश स्कूल कवठे मध्ये विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमाला मिळाली चालना

85
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम’ हा अभिनव प्रकल्प साकारत आपल्या कल्पकतेची आणि तंत्रज्ञानातील प्रयोगशीलतेची अनोखी झलक दाखवली आहे.या प्रकल्पाच्या निर्मितीत कु. वरद थोरात, कु. आशुतोष पोकळे, कु. सोहम गायकवाड आणि कु. देवदत्त सरोदे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आर्डुइनो,पाणी पातळी संवेदक यांसह विविध तांत्रिक घटकांचा वापर करून पाणी व्यवस्थापन प्रणालीची प्रत्यक्ष कार्यरत अंमलबजावणी केली आहे.
या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक मुंजावडे एस. डी.तसेच अटल लॅब व एनपॉवर युवा समन्वयक  बोंबे एस. आर.यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले आहे.
चित्रफितीचीही विशेष दखल
विद्यालयाचा इयत्ता ९ वी ‘अ’चा विद्यार्थी कु. यश उचाले याने या उपक्रमाची सुंदर चित्रफीत तयार केली. त्याबद्दल त्याचे कौतुक करून त्याने सुरू केलेल्या ‘यू.सिनेमॅटिक्स’ या उपक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या.
 रयतची ताकद अन् एनपॉवर चे आधुनिक तंत्रज्ञान
रयत शिक्षण संस्थेची भक्कम शैक्षणिक परंपरा आणि एनपॉवर चे स्टेम (STEM), एआय (AI) व नवोपक्रमात्मक शिक्षणाचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पायाभरणी ठरत आहे.रयतची शिक्षणाची ताकद + सक्षमीकरण चे आधुनिक तंत्रज्ञान = नव्या पिढीची प्रगती ही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, प्रयोगशीलतेला आणि नवोन्मेषी विचारांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.कवठे विद्यालयातील बाल विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या कल्पक उपक्रमाचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्राचार्य किसनराव रत्नपारखी,सरपंच मनीषा भोर,व ग्रामस्थांनी मनापासुन कौतुक करीत शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *