समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले एकूण १४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.शिरूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५, ३३१(३)(४) अन्वये दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेले व तपासादरम्यान जप्त केलेले १२१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, एकूण ९ लाख ९० हजार रुपये किमतीचे दागिने फिर्यादी शशांक बापूसाहेब कळमकर यांच्या ताब्यात देण्यात आले.
तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०४/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) अन्वये दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेले व तपासादरम्यान जप्त करण्यात आलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अंदाजे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे, फिर्यादी पूजा गजानन बु-हाडे यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार गणेश पालवे यांच्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली.चोरीचा मुद्देमाल परत मिळाल्याने संबंधित फिर्यादींना मोठा दिलासा मिळाला असून, शिरूर पोलिसांच्या तपास व कारवाईचे कौतुक होत आहे.
Home पुणे ११ लाख ५० हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने मूळ मालकांच्या ताब्यात : शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई

११ लाख ५० हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने मूळ मालकांच्या ताब्यात : शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
BySamajsheel NewsSeptember 3, 20260
Previous Postपशुधन चोरट्यांचा शिरूर पोलिसांकडून पर्दाफाश - दोन आरोपी जेरबंद ; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; म्हशी-बैल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई
Next Postविद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारला ‘वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्प ; न्यू इंग्लिश स्कूल कवठे मध्ये विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमाला मिळाली चालना
