समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूरच्या रामलिंग रोडवरील आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. डॉ. सोनाली हार्दे व डॉ. मनीषा चोरे यांनी पोलिसांना ताणाची लक्षणे, मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापनाच्या उपायांबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
यावेळी आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कूलमधील विशेष मुलांनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलीस बांधवांच्या मनगटावर बांधून रक्षाबंधन साजरे केले. विशेष मुलांच्या निरागस प्रेमामुळे पोलीस आणि मुलांमध्ये स्नेहाचा अनोखा बंध निर्माण झाला. त्यानंतर मुलांनी दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला.शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापिका आरती बोऱ्हाडे, विशेष शिक्षक कुणाल बिडगर, दत्तात्रेय दुबे तसेच मदतनीसांचा सन्मान करण्यात आला.“ताण टाळता येत नाही; मात्र त्याला सामोरे जाण्याची पद्धत बदलता येते,” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थापिका ॲड. रानीताई चोरे यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी, पालक, शिक्षक व मान्यवरांचे आभार मानले.
Home पुणे विशेष मुलांनी शिरूर पोलिसांच्या मनगटावर बांधली प्रेमाची राखी :‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ मार्गदर्शनासह रक्षाबंधन, दहीहंडी व शिक्षक दिनाचा स्नेह सोहळा

विशेष मुलांनी शिरूर पोलिसांच्या मनगटावर बांधली प्रेमाची राखी :‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ मार्गदर्शनासह रक्षाबंधन, दहीहंडी व शिक्षक दिनाचा स्नेह सोहळा
BySamajsheel NewsSeptember 8, 20260
