NEWS
Search

विद्यार्थी दशेत मोबाईलचा अती वापर टाळा तरच जीवन यशस्वी : सचिन भोजने

29

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) : विद्यार्थ्यांच्या जीवनात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापर एकाग्रता नष्ट करतो. मोबाईलचा वापर टाळला किंवा मर्यादित ठेवला, तरच विद्यार्थी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून जीवनात यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन स्वयंसेवक अनाथ आश्रम (मंगळक पारगाव) चे संस्थापक सचिन भोजने यांनी केले.
कवठे येमाई येथील ‘नवज्योत कला क्रीडा सांस्कृतिक मंडळा’ यांच्या वतीने गणेशोत्सव २०२६ च्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कवठे येथील विद्यार्थ्यांना ‘सोशल मीडिया व मोबाईलचे दुष्परिणाम’ या विषयावर सचिन भोजने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन भोजने यांनी मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारे परिणाम स्पष्ट केले. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील वेळ वाया जातो तसेच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर करून शिक्षण, खेळ आणि सामाजिक उपक्रमांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मार्गदर्शनातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी कावा’ युद्धतंत्रावर प्रकाश टाकला. तसेच हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या शौर्याबद्दल व स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी चा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला.कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत अभ्यास, ध्येय आणि संस्कार यांना प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *